आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्ड:वयाच्या सातव्या वर्षी देशना ‘गिनीज’मध्ये!

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम व्यावसायिक आदित्य नहार यांची मुलगी देशना हिने वयाच्या सातव्या वर्षी ‘लिंबो स्केटिंग’ या अत्यंत अवघड स्केटिंग प्रकारात केवळ १३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण करीत जागतिक विक्रम करून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. तिला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. ती पुणे येथील हचिंग स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे.

देशनाला पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड निर्माण झाली होती. तिने गेली दोन वर्षे रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव पाठीशी घेऊन तिने जागतिक विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.

बातम्या आणखी आहेत...