आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याच्या MCA क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचे क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटलचा सामाना शनिवारी खेळवला गेला. पिंपरीतील काही जणांनी सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे पुढे आले असून त्यांच्याकडून 27 लाखांची रोकड आणि 8 मोबाईल गुंडा विरोधी पथकाने जप्त केले आहेत. ही कारवाई रात्री साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ज्या फ्लॅटवर छापा टाकला, तो फ्लॅट स्टेडियमपासून 5 किलोमीटर अंतरावर होता.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीवरून हा छापा टाकण्यात आला आहे. हे सट्टेबाजीचे मोठे रॅकेट आहे, त्यामुळे याप्रकरणी अन्य लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. या छाप्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनी उर्फ भूपेंद्रसिंह चरणजित सिंग गिल (38), रिक्की राजेश खेमचंदानी (36) आणि सुभाष रामकिसन अग्रवाल (57) यांचा समावेश आहे. त्याच्याशिवाय सनी सुखेजाविरुद्ध भादंविच्या कलम 353, 34, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत
याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हजरत मोहम्मद पठाण यांनी आरोपीविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक सनी गिल हा पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंद असलेला बदमाश असून त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
या छाप्याबाबत माहिती देताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने म्हणाले की, काळेवाडी येथील राजवाधेनगर येथील सोसायटी फ्लॅटमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस पथकाला खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार येथे पोहोचल्यानंतर सनी गिलच्या वैभव पॅराडाईज येथील फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. येथे गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यावर सट्टा घेतला जात होता. येथे तीन जण उपस्थित होते, त्यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून 27 लाख 25 हजार 450 रुपये रोख, 8 मोबाईल फोन व जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपींनी केला पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, हरीश माने आणि त्यांच्या पथकाने वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. ते सर्व क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे पुढे आले. त्यांच्याकडून 27 लाख रुपये रोख आणि 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यापैकी सनी चरसिंग याने पोलिसांसोबत झटापट करून माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्हाला बघून घेऊन अशी धमकी दिली अस तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.