आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. या वादात आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाणे परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
ठाकरे सरकारवर गुणरत्न सदावर्तेंचा निशाणा
राज्यात मनसेच्या अल्टिमेटममुळे वातावरण तापले आहे, असे असताना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणी आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. ठाकरे सरकार भोंग्यांच्या आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले आहे.
काय म्हणाले वकील गुणरत्न सदावर्ते?
देशाच्या राज्यघटनेने सर्वांनाच धार्मीक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. अशावेळी कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा, असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे सरकार हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
शरद पवारांनी मध्यस्थी करावी
याप्रकरणी शरद पवार यांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. दरम्यान, एसटी आंदोलन आणि त्यातील वादग्रस्त भूमिकेमुळे विविध पोलिस स्टेशनमध्ये सदावर्तेंवर गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी भोंग्यांच्या आंदोलनातही उडी घेतली असून सरकारला पुन्हा एकदा लक्ष केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.