आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखु मिश्रीत गुटखा:कर्नाटक येथील ट्रकमधून 25 लाखांचा गुटखा जप्त

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदापूर परिसरात नाकाबंदीदरम्यान कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने निघालेला संशयित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यातील प्लास्टिक गोणीच्या मालाची तपासणी केली असता तंबाखु मिश्रीत गुटखा आढळून आला. ट्रकमधील २४ लाख ७५ हजार रुपयांचा ५० बॉक्स गुटखा व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालक व मालकाविरुद्ध कलम ३२८ व इतर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, विभागीय पोलिस अधीकारी गणेश इंगळे, इंदापूरचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...