आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कशाला चिंता:हापूस आंबा खरेदी करा EMIवर; पहिले खा, मग 12 महिन्यांत फेडा पैसे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात देवगढ, रत्नागिरी येथून हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. पण, वाढत्या महागाईमुळे अनेकजण या आंब्याची खरेदी टाळत आहेत किंवा कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. यावर पुण्यातील एका व्यापाऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. थेट EMIने हापुस आंब्याची विक्री या व्यापाऱ्याने सुरू केली आहे.

EMIवर हापूस का नाही?

गौरव गौरव सनस असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रोडक्ट्सतर्फे ग्राहकांना आता EMIवर आंबे विकले जात आहेत. पीटीआयशी बोलताना याबाबत गौरव गौरव सनस यांनी सांगितले की, हापुस हा फळांचा राजा आहे. मात्र, त्याच्या किंमती अनेक ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. त्यामुळेच ग्राहकांना फ्रिज आणि एअर कंडिशनर EMIवर खरेदी करता येत असेल तर हापूस का नाही?, असा विचार मी केला.

व्यापारी म्हणतात- प्रत्येकाला परवडेल

किरकोळ बाजारात सध्या हापूस आंबा 800 ते 1300 रुपये प्रति डझन दराने विकले जात आहेत. पीटीआयशी बोलताना गौरव सनस यांनी दावा केला की, संपूर्ण देशात EMI वर आंबे विकणारे ते पहिले विक्रेते आहेत. पुढे गौरव सनस म्हणाले, अनेकांना इलेक्ट्रिक साधने परवडत नसल्याने ते EMIवर त्यांची खरेदी करतात व नंतर त्याचे हफ्ते फेडतात. त्याप्रमाणेच हापूस आंबाही EMIवर पहिले खरेदी करता येईल व नंतर अगदी 12 महिन्यांपर्यंत त्यांना हे हफ्ते फेडता येतील. त्यामुळे प्रत्येकाला हापूस आंबा परवडेल.

आतापर्यंत 4 ग्राहकांनी घेतला लाभ

खरेदी प्रक्रियेबाबत गौरव सनस यांनी सांगितले की, ईएमआयवर हापूस आंबा खरेदी करण्याची प्रक्रिया हप्त्यांवर मोबाइल फोन खरेदी करण्यासारखीच आहे. ग्राहकाने क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे आणि खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा 12 महिन्यांच्या EMI मध्ये फेडायची आहे. मात्र, या EMI सुविधेचा लाभ घेण्यासाठी किमान 5,000 हजार रुपयांची खरेदी आवश्यक आहे. तसेच, आतापर्यंत चार ग्राहकांनी याचा लाभ घेतल्याचेही सनस यांनी सांगितले.