आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीव्र मानसिक आजाराच्या रुग्णांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय न्यासाची स्थापना करावी अशी मागणी परिवर्तन संस्था संचालित 'किरण मानसिक आधार गटातर्फे हमीद दाभोळकर व पदाधिकारी तसेच रुग्ण आणि नातेवाईकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोलकर ,रेश्मा कचरे ,राजू इनामदार आणि किरण आधार गटाच्या मार्फत मोरेश्वर देशमुख ,संगीता पुरंदरे ,संगीता आंबेडकर, सुरेश डुंबरे,कार्तिक कारेकर उपस्थित होते.
डॉ. दाभोलकर म्हणाले, सध्याच्या धकधकीच्या जीवनात समाजातील मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. समाजातील साधारण एक टक्के लोकांना स्किझोफ्रेनिया यासारख्या तीव्र मानसिक आजाराचा त्रास होत असतो. अशा लोकांना समाजात हिणवले जाते आणि अज्ञानातून ते अंधश्रद्धांना बळी पडतात. त्यांना दूर लोटण्यापेक्षा समाजाने आधार दिला तर त्यामधील अनेकजण सन्मानाने जीवन जगू शकतात. पुण्यातील विविध व्यवसायिकांच्या मदतीने 200 पेक्षा अधिक मानसिक आजारातून सावरलेल्या रुग्णांना आम्ही रोजगार मिळवून दिला आहे.
सुरेश डुंबरे यांनी स्किझोफ्रेनिया दिवसाच्या निमित्ताने २० मे रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागह घोले रोड, शिवाजीनगर येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत ' मानसरंग ' हा मानसिक आजारी व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक यांचा सांस्कृतिक अंगाने मानसिक आरोग्य विषयी जनजागृती कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. यास प्रसिद्ध लेखक राजन खान आणि दिग्दर्शक अतुल पेठे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मानसिक आजारी व्यक्तींना समुपदेशन करण्यासाठी 7412040300 ही हेल्पलाइन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
या आहेत प्रमुख मागण्या
- मानसिक विकलांग मित्रांसाठी शासनाने आणि योजना सवलती दिलेले आहेत, त्याचप्रमाणे मनोविकारग्रस्त व्यक्तींना आणि संस्थांना सवलती व तत्सम योजना अमलात आणावेत.
-दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्रीय ओळखपत्रे देणे सुरू झाले आहे. हे ओळखपत्र सर्व पुरावे, तपासणी करून दिलेले असल्याने अशा ओळखपत्र धारकांकडे आणि संस्थांकडून अन्य पुरव्याची मागणी केली जाऊ नये.
-मनोविकार ग्रस्तांसाठी आरोग्यविमा, आयुर्विमा मान्य झाला आहे. पण त्याचे प्रीमियम परवडत नाही., केंद्र व राज्य सरकारने दिव्यांगांच्या आरोग्य विमासाठी पुढाकार घेऊन पिक विम्याच्या धर्तीवर एक रुपया प्रीमियमने आरोग्य विमा सुरू करावा.
- मनोविकाराची औषधे बरीच महाग असतात., तरी सर्व मानसिक रुग्णांसाठी सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यात यावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.