आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौटुंबिक वादातून पती हा पत्नीस मारहाण करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना वारंवार घडताना आपण पाहतो. मात्र देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पतीने कौटुंबिक वादातून पत्नीला कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करत तिला गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
तर, सासऱ्याने सुनेला घरामध्ये जबरदस्तीने 150 उठा बशा काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पती, सासऱ्यासह सासरच्या व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी एकूण पाच जणांवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात जावेद मुबारक मुल्ला या तक्रारदार महिलेच्या पतीसह तिचे सासू-सासरे, दिर आणि नणंद यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना नऊ मे रोजी रात्री पावणे बारा वाजता देहूरोड परिसरातील आदर्श नगर या ठिकाणी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी जावेद मुल्ला यांचे 26/ 12/ 2021 रोजी लग्न झाले. त्यानंतर संबंधित महिला ही पतीसह सासरी राहत असताना, लग्न झाल्यापासून घरातील छोट्या -छोट्या कारणावरून पती-पत्नीशी सातत्याने वाद घालत होता. पत्नीला वाईट वाईट शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, तसेच कंबरेच्या बेल्टने मारहाण करत जखमी केले.
नऊ मे रोजी रात्री पती आणि पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर, पतीने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्याचप्रमाणे सासऱ्याने सुनेला घरामध्ये जबरदस्तीने 150 उठा बशा काढायला लावल्या. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.