आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:भाजपने एकनाथ शिंदेंच्या गटाला विलीन होण्याची अट घातली आहे का : आंबेडकर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत पक्षातून वेगळे झालेल्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल, अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का, असे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष किंवा राज्यपाल यांना त्यांचा वेगळा गट असल्याबाबतचे लेखी पत्र द्यावे लागेल. त्यांनी संबंधित पत्र राज्यपाल यांना न देता विधानसभा उपाध्यक्ष यांना दिले, तर त्यांच्यासमोर वेगळ्या गटातील प्रत्येक आमदारास प्रत्यक्ष बाेलावून त्यांची सही खरेच आहे का, ही बाब तपासून पाहावी लागेल. त्यानंतरच पक्षांतर बंदी कायद्याबाबत वेगळ्या गटाचे अस्तित्व मान्य होऊ शकेल. एकनाथ शिंदे आगामी काळातही त्यांचा गट एकत्रित ठेवू शकतात का, हे पाहवे लागणार असल्याचे ते म्हणाले.