आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत असताना कुणाला त्रास दिला नाही:विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भाजपला टोला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या तपास यंत्रणांकडून राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या कारवाया पाहता सुडाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. राजकीय द्वेषातून कुणी कुणाला त्रास देऊ नये, या मताचा मी आहे. महाविकास आघाडी सरकार मागील अडीच वर्षे राज्यात हाेते. त्यावरून काही जण आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आराेप करतात. परंतु मी आत्तापर्यंत कधीही सत्तेत असताना कुणाला त्रास दिलेला नाही. सर्वांना कायदा, संविधान समान आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा विचार करून पुढे गेले पाहिजे, असे मत राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...