आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला शांतता हवी, मात्र काही लोक द्वेषाचं राजकारण करतात. पाकिस्तानची जनता आपले विरोधक नाही तर जे राजकारण करून लष्कराच्या मदतीने सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते संघर्ष आणि द्वेष पसरवतात. बहुतांश लोक पाकिस्तानात शांतता राहावी या बाजूचे आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केले आहे.
पुण्याच्या कोंढवा परिसरात झालेल्या ईद मिलन कार्यक्रमात शरद पवार सहभागी झाले होते. यावेळी पवारांनी भारत-पाकिस्तान यांच्या नात्यावर भाष्य केले.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कौतूक
शरद पवार यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कौतुक केले. ''पाकिस्तानातील युवा नेता देशाला दिशा देण्याचे काम करत होता परंतु त्याला सत्तेतून बाहेर काढले गेले असेही पवार म्हणाले.
नेमके काय म्हणाले पवार?
''पाकिस्तानची सामान्य जनता भारताची शत्रू नाही. राजकारण करणारे काही लोक सैन्याच्या मदतीने सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत ते संघर्षाच्या स्थितीत आहे. त्यांच्याद्वारे जाती-पाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. लोकांना शांतता हवी. कुठलाही धर्म द्वेष करण्यास शिकवत नाही, आम्हालाही द्वेष नको तर विकास हवा असेही शरद पवार म्हणाले.
नव्या पिढीला रोजगार हवा
पवार म्हणाले, ''आम्ही असे वातावरण बनवू इच्छितो जेथे महाराष्ट्र आणि देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जाईल. देशातील लोकांना विकास हवा आहे. आम्हाला महागाईपासून दिलासा हवा असून नव्या पिढीला रोजगारही हवा आहे असेही पवार म्हणाले.
काही जण तेढ निर्माण करीत आहेत
शरद पवारांनी राज ठाकरे आणि भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता काहीजण जाती-धर्मात तेढ निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. सध्या जगात अजब स्थिती निर्माण झाली. एकीकडे बलाढ्य रशिया यूक्रेनवर हल्ला करीत आहे, श्रीलंकेत तरुण रस्त्यावर उतरले आहेत. महागाईपासून जनता त्रस्त झाली आहे याकडे लक्ष वेधताना पवारांनी ईदच्या निमित्ताने आपण कर्तव्य म्हणून एकता कायम ठेवायला हवी. ईदसारख्या कार्यक्रमात विविध धर्माचे लोक सहभागी झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.