आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण भेलके याला 8 वर्षे सक्तमजुरी:माओवादी संघटनेचा सक्रिय सदस्य असल्याच्या ठपका, 42 हजार दंडही ठोठावला

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अरुण भेलके याला न्यायालयाने आठ वर्षे सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.२०१४ मध्ये अरुण भेलके ऊर्फ आदित्य पाटील आणि त्याची पत्नी कांचन ऊर्फ सोनाली पाटील (३३) एटीएसने चाकण येथून अटक केली होती. यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भेलके हा येरवडा कारागृहात आहे. तर कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कांचनला हृदयरोगाचा त्रास होता. तिच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. अरुण आणि कांचन दोघेही चंद्रपूरचे आहेत. त्यांनी माओवादी संघटनेच्या आदेशानुसार मुंबई, पुण्यातील तरुणांना माओवादी चळवळीत ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या दोघांवर आहे.

बातम्या आणखी आहेत...