आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगली:मरेपर्यंत राजू शेट्टी यांच्यासोबत जाणार नाही, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा पलटवार

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.

एकेकाळी राजू शेट्टींना माझा हात गोड वाटत होता, आता त्यांना तो कडू वाटत आहे. हा त्यांनी ज्या चोरांशी संगत केली त्याचा परिणाम आहे. मी मरेपर्यंत कधीही शेट्टींसोबत जाणार नाही, असा पलटवार माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. त्यावर पलटवार करताना खोत म्हणाले, काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी पुन्हा मैत्रीसाठी त्यांच्याकडे हात केलेला नाही. मी एवढेच म्हणालो होतो की, त्यांनी जर अलिबाबा आणि ४० चोर यांची संगत सोडली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र होऊ शकतो.

प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी मी एकत्र येण्याबाबत बोललो होतो. मात्र, शेट्टींना माझे हात आता बरबटलेले वाटतात. मला हाकलून देण्याची भाषा त्यांनी केली असल्याने आता एकीचा प्रश्नच नाही. पण मी त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी याचना केलेली नाही. ते भ्रमात आहेत.

दरम्यान, खोत यांची संघटना असलेल्या रयत क्रांतीने अद्याप भाजपबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र, खोत यांच्या मनात अजूनही खदखद असल्याचे अजून तरी दिसत आहे. त्यामुळे भाजप आता खोत यांच्या संघटनेबाबत काय भूमिका घेते याकडे भाजपसह रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागल्याचे सध्या तरी दिसत असल्याचे चित्र आहे.

जनतेने त्यांना जागा दाखवून दिली हातकणंगले मतदारसंघातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांनी आता भ्रमातून बाहेर यावे. या जन्मात तरी त्यांच्याशी मी कधीही एकत्र येऊ शकत नाही. माझी रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसाठी लढत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खोत यांच्या आरोपावर आता राजू शेट्टी काय भूमिका मांडतात याकडे दोघांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...