आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:पेपर फुटल्यावरही का घेतल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा? उमेदवारांच्या पुणे पोलिसांकडे तक्रारी दाखल

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आराेग्य भरती परीक्षेत माेठ्या प्रमाणात घाेळ झालेला असून गट ‘क’ व ‘ड’चे परीक्षेचे पेपर फुटल्याचे आम्ही सांगितलेले हाेते. परंतु आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. दाेन्ही परीक्षा रद्द करण्यात येण्यासाठी परीक्षांवर सामूहिक बहिष्कार आम्ही टाकण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले हाेते. पेपरच्या दिवशी ठाण्यातील साकीनाका येथील विद्या मंदिर येथे काही जणांकडे आधीच पेपर असल्याचे स्पष्ट झाले व पेपर फुटल्याचेही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर गाेंधळ उडाला. पेपर फुटल्याचे आधीच स्पष्ट हाेऊनही परीक्षा कशासाठी घेण्यात आल्या हे आम्हाला समजत नाही, असा सवाल एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी उपस्थित केला.

बडगिरेकडून उडवाउडवीची उत्तरे : राष्ट्रीय आराेग्य विभागाचा तांत्रिक सहसंचालक महेश बाेटले याने गट ‘क’ व ‘ड’चा पेपर लातूरचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याच्या साहाय्याने फाेडल्याची कबुली पाेलिसांसमाेर दिली आहे. परंतु बडगिरे पाेलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत असून त्याने छातीत दुखत असल्याचे सांगत रुग्णालयात तपासणीसाठी जात पळवाट शाेधण्याचा प्रयत्न केला. बाेटले याच्याकडून गट ‘क’ व ‘ड’चा पेपर एक महिन्यापूर्वीच बडगिरे यास मिळाल्याने नेमके त्याने पेपर काेणाकाेणाला दिला आहे, याबाबतची माहिती देण्यास ताे नकार देत आहे. गट ‘ड’ची साखळी पाेलिसांनी उघडकीस आणली आहे. परंतु गट ‘क’च्या माध्यमातून किती जणांपर्यंत पेपर पाेहोचवला गेला, काेणकाेणते एजंट यात सहभागी झाले, किती रुपयांची आर्थिक उलाढाल झाली याबाबतची चाैकशी पाेलिसांना बडगिरेकडे करायची आहे.

परीक्षा कशी होणार याची उमेदवारांना चिंता उपमुख्यमंत्री अजित पवार साेमवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आराेग्यमंत्री राजेश टाेपे, आराेग्य विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करून परीक्षा रद्द करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी वारंवार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. परंतु एमपीएससीवर आधीच इतर परीक्षांचा ताण असल्याने त्यांना परीक्षा घेता येणे शक्य नसल्याची भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने राज्यभरातील लाखाे विद्यार्थ्यांना नेमकी परीक्षा कशा प्रकारे पारदर्शक पद्धतीने हाेऊ शकेल, याची चिंता लागलेली आहे.

चार महिन्यांपूर्वीच नागपूर खंडपीठात याचिका : आराेग्य विभाग, वन विभाग, शिक्षक भरती परीक्षा संशयास्पद असून या गैरव्यवहाराची चाैकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी याचिका चार महिन्यांपूर्वी आम्ही नागपूर खंडपीठात केली आहे. २८ फेब्रुवारी राेजी राज्यात आराेग्य विभागाच्या वतीने ५४ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यातही गाेंधळ असून त्याबाबत तक्रार न आल्याने पाेलिसांनी चाैकशी केलेली नाही.

परीक्षा रद्द करण्याची नामुष्की
राज्यभरात आराेग्य विभागाचे वतीने गट ‘क’ आणि गट ‘ड’ करिता घेण्यात आलेला परीक्षांचे पेपर फुटल्याची बाब दाेन्ही परीक्षांचे पेपर ठरवणाऱ्या समितीतील तांत्रिक सहसंचालक महेश बाेटले याने पाेलिसांसमाेर कबूल केली आहे. तसेच पेपर फुटल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांनी पुणे पाेलिसांकडे केल्या आहेत. त्यामुळे सदर दाेन्ही परीक्षा रद्द करण्याशिवाय सरकारसमाेर दुसरा पर्याय नसून परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...