आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबादेत रविवारी एका जाहीर सभेत मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना उपरती झाली. त्यांनी आता या वक्तव्यावर माफी मागितली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे सावंतांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
हे वादग्रस्त वक्तव्य?
सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे वादग्रस्त केले होते.
सावंतांच्या राजीनाम्याची मागणी
मराठी समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता सावंत यांनी मराठी समाजाची जाहीर माफी मागितली आहे, त्यामुळे तूर्तास प्रकरण थंडावेल अशी आशा आहे.
काय म्हणाले सावंत?
सावंत म्हणाले, मराठी समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता . तसेच माझ्या विरोधात जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जातो आहे. बोलण्याच्या अघोत आपण बोलून जातो. त्याचा अर्थ कुठे तरी मराठी समाजाच्या भावना दुखवाव्यात. त्यावर कुठे तरी राजकीय ताशेरे मारावेत. या पठडीतला मी मुळीच नाही. हे तुम्ही आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे माझ्या समजाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील. तर माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची जाहीर माफी मागतो.
माझा हेतू तसा नव्हता
सावंत म्हणाले, मराठा समाजातील मुला-मुलींना त्यांच्या करिअर करीता आरक्षणाची गरज आहे. आमचा समाज मागासलेला आहे. तसेच ज्या कोणी ते वक्तव्य दाखवले. पण जवळपास तासभर मी बोललो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही. तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. ग्रामीण भाषेत ओघवत्या शैलीत मी बोलून गेलो आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.
जाहीर माफी मागतो
समाजातील पाळण्यातील मुलांपासून आजोबा पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो आहे. केवळ माफी मागून मी स्वस्थ बसणार नाही तर, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी अविरत प्रयत्न करत राहणार आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.