आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्याच्या चांदनी चौक परिसरात शनिवारी संध्याकाळी अचानक एका ट्रकमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारत स्वतःचे प्राण वाचवले. स्थानिक लोकांनुसार, आग लागल्या नंतरही ट्रक काही काळ रस्त्यांनी धावत होता.
शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजता झालेल्या या घटनेनंतर वारजे ब्रिजवर जवळपास 1 तास ट्रॅफिक जाम होते. यादरम्यान बँगळुरू-पुणे हायवेवर गाड्यांची लांब रांग पाहायला मिळाली.
इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लागली आग
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल विभागाने घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी ट्रकचा पुढील भाग जळून खाक झाला होता. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधील इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागली. चालत्या ट्रकमधून उडी मारल्याने चालकाला किरकोळ दुखापत झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.