आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतारा कमी:यंदा शंभर वर्षातले विक्रमी ऊस उत्पादन; राज्यात 210 कारखान्यांकडून तब्बल 1053 लाख मेट्रिक टन गाळप

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मागील शंभर वर्षातील सर्वाधिक गाळप हंगाम पार पडला असून राज्यातील 210 साखर कारखान्यांकडून 1053 लाख मॅट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम तीन महिन्यांवर आला असून कोणाचाही ऊस गाळपसाठी शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

क्षमता वाढली, उतारा कमी

गायकवाड म्हणाले, गाळप क्षमता वाढली तरी सरासरी साखरेचा उतारा कमी झालेला आहे. खोडवा पीक, सातत्याने अवकाळी पाऊस यामुळे ऊसाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट निर्माण झाली आहे. मागील हंगाम सरासरी 173 दिवसांचा होता. मात्र, यंदाचा गाळप हंगाम सरासरी 121 दिवसांचा राहिलेला आहे.

52 दिवस कमी झाल्याने त्याचा तोटा कारखान्यांना निर्माण झाला आहे. राज्यातील 22 जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत असून अवकाळी पाऊस गारपीट यातही ऊस कायम राहिल्याने कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई ऊसाला द्यावी लागली नाही. दुष्काळी भागातही ऊस वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. एफआरपीवरही आयुक्तालयाने नियंत्रण ठेवले असून एकूण 33 हजार 278 कोटी एफआरपी पैकी 96% एफआरपीचे वाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे.

इथेनॉल निर्मितीकडे वाढता कल

मागील ऊस गाळप हंगामात 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळालेली होती. मात्र, यंदा हे प्रमाण 16 लाख टनापर्यंत वाढलेले आहे. 226 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती मागील हंगामात होती. यंदा ती २४४ कोटीपर्यंत वाढलेली आहे.पुढील वर्षी अखेरीपर्यंत त्याचे प्रमाण 300 कोटी पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे वाढते उत्पादन पाहता कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले असून पाच कारखाने पुढील हंगामात केवळ इथेनॉलवर भर देतील असे दिसून येत आहे.