आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू महिला सभेतर्फे क्रांती दिनानिमित्त सिर्फ या संस्थेच्या सुमेधा चिथडे यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते 'साहस'पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सियाचीन या जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीवर आणि काश्मीरमधील कुपवाडा सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांटची उभारणी आणि सैनिकांसाठी त्यांनी केलेल्या विविध कामांसाठी चिथडे यांचा गौरव करण्यात आला. मानपत्र आणि ११ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी सुमेधा चिथडे म्हणाले, सैनिकांसाठी काम करताना गरजा आणि हाव यातील फरक कळले. जात, धर्म,वंश, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सैन्यदल. ते ठराविक वेळेत कार्य करत नाही, की एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून संपावर जात नाहीत. स्वतः जगताना राष्ट्र प्रथम हा विचार घेऊन जगत असतात स्वतः पलीकडे जगण्याची प्रेरणा सैनिक देतात. यावेळी सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले उपस्थित होत्या.
राष्ट्रापुढे अनेक आव्हाने
चिथडे म्हणाल्या, आजही आपल्या राष्ट्रापुढे खूप मोठी आव्हाने आहेत. भविष्यात आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी आताच आपण पुढे येऊन राष्ट्र सेवेसाठी कार्य केले पाहिजे. किर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आजही आपल्याला अनेक सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिस दलासाठी, रस्त्यावरील भीक मागणाऱ्या मुलांसाठी, स्वच्छतेसाठी अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी सुमेधा यांच्यासारख्या रणरागिणींची गरज आहे. पुढील संघर्षाचा सामना करण्यासाठी आपल्या मुलांमध्ये शौर्यवृती निर्माण केली पाहिजे.
सुप्रिया दामले म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हिंदू महिला सभेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे यंदाचे ७२ वे वर्ष आहे. केवळ महिलांनी अतिशय यशस्वीपणे चालविली ही संस्था यापुढेही आपल्या कार्याचा वसा पुढे नेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.