आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मदतीचा हात:रस्त्यावर काठी फिरवणाऱ्या आजीला गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली मोठी आर्थिक मदत

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत

कोरोना या संकटाच्या काळात उदरनिर्वाहासाठी पुण्यातील रस्त्यांवर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करणा-या 85 वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. शांताबाई पवार असे या आजीबाईंचे नाव आहे. एकेकाळी त्या चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या. सीता-गीता आणि शेरनी या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. मात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे त्या रस्त्यावर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करतात. आजीबाईंचा व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पर्यंतही पोहोचला. आज त्यांनी शांताबाई पवार यांची भेट घेत त्यांना मोठी आर्थिक मदत केली.

शांताबाई पवार यांचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पर्यंतही पोहोचला, त्यानंतर त्यांनी शांताबाई यांना भेट म्हणून साडी दिली आणि 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. शांताबाई यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी काठीचा खेळही सादर केला. याबाबत गृहमंत्री म्हणाले, "त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मला त्यांच्याशी भेटण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आज मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलो आहे."

आजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले

कोरोना संकटाच्या काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी शांताबाई पवार यांना लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. याआधी अभिनेता रितेश देशमुख यांनीही आजीबाईला मदत केली. तर अभिनेता सोनू सूदला आजीबाईंसोबत प्रशिक्षण शाळा उघडण्याची इच्छा आहे.