आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात ऑनर किलिंग:प्रेयसीच्या कुटुंबियांकडून 20 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या, 2 अल्पवयीनसह 6 आरोपी ताब्यात

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मयत विराज जगताप. - Divya Marathi
मयत विराज जगताप.
  • मरण्यापूर्वी विराजने झालेल्या घटनेचा उलगडा केला

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. येथे एका युवकाला आपल्या जीताच्या बाहेरील तरुणीशी प्रेम संबंधांमुळे जीव गमवावा लागला आहे. पीडित युवकाचे नाव विराज जगताप असून तो 20 वर्षांचा होता. विराजने मरण्यापूर्वी आपली आपबिती पोलिसांना सांगितली. विशेष म्हणजे, विराजवर हल्ला करून त्याला जीवे मारणाऱ्या 6 आरोपींपैकी 2 अल्पवयीन आहेत.

विराजने मरण्यापूर्वी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तो आपल्या बाइकवरून जात होता, त्याचवेळी भरधाव ऑटो रिक्शाने त्याला धडक मारली. या ऑटोमध्ये तरुणीचे 6 नातेवाइक बसले होते. अपघातात जखमी झालेला विराज उठण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आले. यानंतर त्याला दगडाने ठेचण्यात आले. इतक्या भीषण हल्ल्यानंतर त्या मृत्यू झाला असावा असे समजून हल्लेखोर घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर स्थानिकांनीच त्याला पोलिस आणि डॉक्टरांच्या हवाली केले. परंतु, त्याचा जीव वाचवता आला नाही.

प्रेयसीच्या कुटुंबियांनी भेटायला बोलावले होते

विराजचा भाऊ सागर जगतापने सांगितल्याप्रमाणे, 7 जूनच्या रात्री 9 वाजता विराजला एक फोन आला होता. तो त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी केला होता. विराजला त्यांनी आपल्या घरी बोलण्यासाठी बोलावले होते. आपली मुलगी आणि विराजच्या प्रेम प्रकरणाबद्दल ते विचारणार होते. जेव्हा तो मुलीच्या घरी गेला तेव्हा तिचे कुटुंबीय विराजला शिवीगाळ करत होते. तेव्हा विराज तिच्या घरातून निघून गेला. यानंतर काही अंतरावर गेला असता त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला.

सर्व 6 जण पोलिसांच्या तावडीत

विराजच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 6 आरोपींना मंगळवारी अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 302, 143, 147, 148 आणि 149 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर 6 पैकी दोन अल्पवयीनांना रिमांड होममध्ये पाठण्यात आले. आरोपींच्या विरोधात एससी/एसटी कायदा 1989 अंतर्गत कारवाई झाली आहे. दरम्यान, विराजवर हल्ला केल्यानंतर जेव्हा तो मेल्याचा भास झाला त्यावेळी घटनास्थळी मुलीचा बाप सुद्धा उपस्थित होता. त्याने विराजच्या अंगावर थुंकले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विराजवर हल्ला झाला तेव्हा तो हल्लेखोरांना सोडून देण्याच्या विनवण्या करत होता. परंतु, कुणालाही त्याच्यावर दया आली नाही.

बातम्या आणखी आहेत...