आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:लाॅकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय ठप्प; टोळक्याने लुटले तब्बल 1 कोटी रुपये

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाेरीच्या १ काेटी १२ लाख रुपयांपैकी ९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

लाॅकडाऊनमुळे हाॅटेल व्यवसायात झालेले नुकसान आणि घर, वाहनाचे थकलेले हप्ते यामुळे एका टाेळक्याने लातूर, साेलापूर येथून कुरिअर कंपनीची मुंबईस जाणारी काेट्यवधी रुपयांची राेकड लुटली. पाेलिसांनी या प्रकरणात चाेरीस गेलेल्या १ काेटी १२ लाख ३६ हजार रकमेपैकी ९१ लाख रुपयांची राेकड व दाेन लाख रुपयांचे साेन्याचे दागिने असा ९३ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी दिली.

याप्रकरणी रामदास भाऊसाहेब भाेसले (३०), तुषार बबन तांबे (२२,दाेघे रा. वरुड, ता. शिरूर, पुणे) व भरत शहाजी बांगर (३६,रा. शिरूर, पुणे) या आराेपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चाेरीच्या पैश्यांसह, गुन्ह्यात वापरलेली कार, बुलेट व दुचाकी असा एक काेटी ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या आराेपींचे तीन इतर साथीदार फरार असून त्यांचा शाेध पाेलिस घेत आहेत. आराेपी रामदास भाेसले याचा भरत बांगर हा बहिणीचा पती असून इतर आराेपी त्याचे मित्र आहेत. याप्रकरणी हिंतेद्र जाधव (रा.वाघाेशी, ता.फलटण, सातारा) यांनी यवत पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लातूर येथील शिवगंगा कुरिअर व साेलापूर येथील न्यू इंडिया कुरिअर कंपनीचे चार जण २ आॅगस्ट राेजी रात्री लातूर ते मुंबई बसने साेलापूर ते पुणे महामार्गाने प्रवास करत हाेते. त्यावेळी पाटस टाेल नाक्यापासून ४ किमीवर चार अनाेळखी आराेपींनी पाेलिस असल्याची बतावणी करून बस अडवून कुरिअर कंपनीच्या चाैघांना खाली उतरवून चाैघांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातून राेख रक्कम व साेन्याचे दागिने घेऊन आराेपी पसार झाले.

उसाच्या शेतात लपवले होते रुपये
लातूर, साेलापूर भागातील ५० ते ६० व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन कुरिअर कंपनीची माणसे मुंबईला डिलिव्हरीसाठी जात हाेती. त्याकरिता त्यांना एक ते दाेन टक्क्याने कमिशन मिळते. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवत आराेपींनी चाेरीची याेजना आखली. चाेरी केल्यानंतर आराेपींनी रामदास भाेसलेच्या उसाच्या शेतात पाेत्यात पैसे लपवून ठेवले. याप्रकरणात कुरिअर कंपनीचे काेणी सहभागी आहे का? याबाबत तपास करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...