आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील घटना:बिल मागितले म्हणून हाॅटेलच्या मॅनेजरला ग्राहकांकडून बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील लाेहगाव परिसरातील हॉटेल मराठा दरबार येथे आलेल्या चार ग्राहकांना हॉटेलचे बिल मागितले म्हणून त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चार आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी गुरुवारी दिली आहे.

याबाबत हाॅटेल मराठा दरबारचे मॅनेजर संताेष राघेंन्द्र शेट्टी (वय-42,रा.वाघाेली,पुणे) यांनी आराेपीं विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकार 20 जून राेजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबत रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तक्रारदार यांनी पाेलिसांकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संताेष शेट्टी हे मराठा दरबार मध्ये मॅनेजर पदावर काम करतात. त्यांच्या हॉटेल मध्ये चार अनाेळखी इसम ग्राहक म्हणून आले हाेते.

लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

पाण्याची बाटली व काेल्ड्रींक्सची मागणी केली असता त्यांनी पाण्याची बाटली व काेल्ड्रींग त्यांना दिले. मात्र, काहीवेळाने सदर बिलाचे कारणावरुन आराेपींनी त्यांना वाईट वाईट शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जवळच पडलेल्या दगडाने मारहाण करुन त्यांचे दाेन्ही डाेळयांचे भुवईवर, कपाळावर, नाकावर, हनुवटीवर तसेच चेहऱ्यावर तसेच डाेक्याला जखम करुन आराेपी पसार झाले. त्यानंतर हाॅटेल मधील कर्मचाऱ्यांनी शेट्टी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेवुन परतल्यानंतर त्यांनी याबाबत पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विमानतळ पाेलिस ठाण्याचे पाेलिस नाईक सचिन जाधव याबाबत पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...