आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅटेल मालकाकडून ग्राहकांवर चाकूने वार:कात्रज भागातील घटना; दोन संशयितांना अटक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हाॅटेलमध्ये झालेल्या वादातून हाॅटेलमालकाने दोन ग्राहकांवर चाकुने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागात उघडकीस आली. या संबंधित प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

निशांत जाधव (वय 25, रा. धनकवडी,पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोहर रघुनाथ मांगडे (वय 44), ऋषिकेश जयसिंग देशमुख (वय 30, दोघे रा. मांगडेवाडी, कात्रज,पुणे) यांना अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

जाधव यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव आणि त्यांचा मित्र मांगडेवाडी भागातील मल्हार फॅमिली रेस्टाॅरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी जाधव आणि त्यांचा मित्र मोठ्याने गप्पा मारत होते. त्या वेळी हाॅटेलमालक मनोहर मांगडे आणि देशमुख यांनी जाधव यांना मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

मांगडे आणि देशमुख यांनी जाधव आणि त्यांच्या मित्रावर चाकुने वार केले. हाॅटेलमधील वेटरने दोघांना बांबूने मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी मांगडे आणि देशमुख यांना अटक करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी शिवप्रसाद विठ्ठलराव दुधाटे (वय 35,रा. उमरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. दुधाटे याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एस रुपनर तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...