आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:मध्य प्रदेशचे आरोपी दैनंदिन रोजंदारीवर करताहेत चाेऱ्या

मंगेश फल्ले | पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात मागील काही दिवसांपासून वारंवार घरफोडीच्या घटना वाढत आहेत. या अनुषंगाने चतुःशृंगी पोलिस स्टेशनच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या टोळीचा माग काढण्याचा दृष्टीने कसून तपास करत मध्य प्रदेशमधून ७ आरोपींना अटक करत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र, संबंधित आरोपींचा तपासात मध्य प्रदेशमधून दैनंदिन एक हजार ते दोन हजार रुपये अशा दोन आठवड्यांच्या रोजंदारीवर वेगवेगळ्या टोळ्या पुण्यासह राज्यभरात येऊन घरफोड्यांचे प्रकार करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात कुकक्षी तालुक्यात तांडा, पिपरानी, टांडा, खनिआंबा, नरवली यासारख्या अनेक गावांमधील बेरोजगार तरुणांच्या टोळ्या देशभरातील विविध भागांत जाऊन घरफोड्या करत असल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणा समोर आहे. जंगली प्रदेशात दुर्गम भागात वाड्या-वस्त्यांवर या टोळ्यांमधील सदस्य वास्तव्य करत असल्याने आणि मोबाइलसारख्या गोष्टीच वापरत नाहीत. त्यामुळे त्यांचा माग काढणे जिकिरीचे होते. तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके, अंमलदार प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, श्रीकांत वाघुले, बाबा दांगडे यांनी पहाटे सलग दोन ते तीन आठवडे चोरी झालेल्या सोसायटीच्या परिसरात आणि ओढ्याच्या पात्रात पाळत ठेवली. रात्रीच्या वेळी आरोपी हे घरफोडी करून जात असताना मध्य प्रदेशच्या सात आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील तपासात एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहे.

संबंधित टोळीची घरफोडी करण्याची पद्धत या टोळीत पाच ते सहा सदस्य असतात. यात टोळी प्रमुख इतर लोकांना घरफोडी, चोऱ्या करण्यासाठी दैनंदिन रोजंदारीवर घेऊन ट्रॅव्हल्सने पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, रायगड आदी भागात येतात. मात्र, शहरात आल्यावर कोणत्याही लॉज, एका वाहनाचा वापर ते करत नाहीत. सार्वजनिक शौचालयाचा वापर करून सार्वजनिक ठिकाणांवरील फुटपाथवर ते राहतात. वेगवेगळ्या गटाने वावरतात. नदी, ओढा पात्रात जवळील सोसायटीमध्ये मध्यरात्रीपर्यत दबा धरुन बसतात.

बातम्या आणखी आहेत...