आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल:HSC बोर्डाच्या बारावीचा निकाल जारी; 99.63% विद्यार्थी झाले उत्तीर्ण, कला विभागाचा निकाल सर्वाधिक 99.83%; कोकण अव्वल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. HSC बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सरासरी निकालांची टक्केवारी जारी केली. त्यानुसार, बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. अर्थातच एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना आपले निकाल सायंकाळी 4 वाजल्यापासून https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in, hscresult.mkcl.org यासोबतच mahresult.nic.in इत्यादी संकेतस्थळांवर पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी हा निकाल जाहीर केला. कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला परीक्षा लांबवण्यात आल्या. त्यानंतर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निकाल कसा लावला जाणार यासाठी बोर्डाकडून एक सूत्र ठरवण्यात आले. त्यानुसारच, मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या विषयानुसार, 4 वाजता निकाल पाहता येतील असे बोर्डाने आधीच जाहीर केले आहे.

विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल

  1. कोकण : 99.81%
  2. मुंबई : 99.79%
  3. पुणे : 99.75%
  4. कोल्हापूर : 99.67%
  5. लातूर : 99.65%
  6. नागपूर : 99.62%
  7. नाशिक : 99.61%
  8. अमरावती : 99.37%
  9. औरंगाबाद : 99.34%

आर्ट्सचा निकाल सर्वात चांगला
बोर्डाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीतील विज्ञान विभागाचा निकाल 99.45%, कला विभागाचा निकाल 99.83%, वाणिज्य विभागाचा निकाल 99.81% आणि एमसीव्हीसीचा निकाल 98.8% इतका लागला आहे.

या ठिकाणी पाहता येईल निकाल
1. https://hscresult.11 thadmission.org.in
2. https://msbshse.co.in
3. hscresult.mkcl.org
4. mahresult.nic.in

असे मिळवा बैठक क्रमांक
सर्वात आधधी http://mh-hsc.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या
यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
आता तुमचे पूर्ण नाव, आडनाव, तुमचे नाव आणि वडिलांचे नाव अशा पद्धतीने नोंद करा
यानंतर तुम्हाला सीट क्रमांक स्क्रीनवर दिसेल

बातम्या आणखी आहेत...