आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:बहुप्रतीक्षित असणारा बारावी निकाल आज दुपारी 4 वाजता; 4 वेबसाइटवर सुविधा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतीक्षित असणारा इयत्ता बारावीचा राज्य बोर्डाचा निकाल मंगळवारी (दि. ३ ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालासाठी ४ संकेतस्थळे बोर्डाने जाहीर केली आहेत.

इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावी वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण, बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र, सराव परीक्षा, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच बारावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण याच्या आधारे गुणदान करण्यात आले आहे, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

इथे पाहता येईल निकाल :
- https:/hscresult.11thadmission.org.in
- https:/msbshse.co.in
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in

बातम्या आणखी आहेत...