आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:सार्वजनिक सौचालयाच्या टाकीत आढळला मानवी हाडांचा सांगाडा, पोलिसांना खूनाचा संशय

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज(दि.17) शौचालयाच्या टाकीची स्वच्छता सुरू असताना टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सफाई कर्मचारी पाण्याच्या टाकीची स्वच्छता करत होते, यावेळी त्यांना हा मानवी सांगाडा सापडला. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. टाकीतील सांगाड्याची ओळख पटली नसून, खून करून मृतदेह टाकीत टाकल्याची चर्चा परिसरात पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...