आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:वानराची शिकार करून मांसाची पार्टी, पोलिसांकडून दोघांना अटक; जुन्नर तालुक्यातील घटना

जुन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

 तालुक्यातील मौजे धालेवाडी तर्फे मिन्हेर येथे वानराची शिकार करुन त्यांच्या मांसाची पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अकट केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील मौजे धालेवाडी येथे आरोपी एकनाथ गोपाळ आसवले(वय 29 रा. कुलवडे, ता. आंबेगाव, पुणे) आणि गणपत शिमगे हिलम(वय 40 रा.धालेवाडी, ता. जुन्नर,पुणे) यांनी वानराचा पाठलाग करुन त्यास मारले आणि त्यांच्या मांसाचे तुकडे करुन खाल्ले. याप्रकरणी आरोपींवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9 व 51 अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, याप्रकरणातील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

0