आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीवर कोयत्याने जीवघेणा वार:चारित्र्यावर संशय घेत विभक्त पतीकडून हल्ला, महिला गंभीर जखमी, पुण्यातील घटना

पुणे | प्रतिनिधी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील एक वर्षापासून विभक्त राहत असलेल्या पतीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिच्यावर कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील सहकारनगर परिसरात घडला आहे. या घटनेत ३७ वर्षीय महिला जखमी झाली आहे. पती अनिल महादेव चांदणे (वय ४०) याच्याविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

आरोपी पतीला अटक

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिल चांदणे यास अटक केली आहे. त्याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. ७ डिसेंबर रोजी गुलाबनगर सोसायटीच्या रिक्षा स्टॅन्डजवळ ही घटना घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील एका वर्षापासून पीडिता व पती विभक्त राहत आहेत. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्याचा राग मनात धरुन महिलेला सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास गुलाबनगर सोसायटीजवळ गाठले. तिला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याने पाठीमागून येवून तिचे केस पकडून तिला हिसका मारुन वाईट शिवीगाळ करुन कोयत्या सारख्या हत्याराने तिच्या उजवे खांद्यावर, मानेजवळ वार केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी करत माहिती घेतली. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस नलावडे करत आहे.

पोलीसात तक्रार दिल्याने घरात शिरुन महिलेवर वार

दुसऱ्या एका घटनेत आरोपीने घरात शिरून महिलेवर वार केल्याचे समोर आले आहे. वानवडी परिसरातील लुल्लानगर येथील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या ५५ वर्षीय आणि ४० वर्षीय दोन बहिणी सात डिसेंबर रोजी रात्री घरात झोपल्या होत्या. त्यावेळी पुर्वीचे किरकोळ वादातून त्यांनी आरोपी काळु सपकाळ (वय-२७) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्याचा राग मनात धरुन आरोपीने घराचे दार वाजवुन शिवीगाळ करत दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर ‘तुम्ही माझ्या विरुध्द पोलिसांत तक्रार करता काय तुम्हाला दाखवितो’ असे म्हणत ४० वर्षीय महिलेस जवळ ओढून तिचा विनयभंग केला. त्यावेळी ५५ वर्षीय महिला मध्ये पडली असता आरोपीने ‘तुम्हा दोघीनांही आता जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणत त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने स्क्रु ड्रायव्हर सारख्या टोकदार हत्याराने महिलेच्या पोटात ते हत्यार घुसवून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलीस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...