आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यातील कोंडवा परिसरात उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेडरूममध्ये नेऊन हिटर गरम करून तिच्या शरीरावर, गुप्तांगावर चटके दिले. त्यानंतर पत्नीशी क्रुरतेने शारीरिक संबंध केले. एवढ्यावरच आरोपीचे कौर्य थांबले नाही तर पत्नीच्या गुप्तांगात आरोपीने दगडी बत्ता घालण्याचा प्रयत्न केला व पत्नीच्या तोंडावर लघवी केली. याप्रकरणी 40 वर्षीय नराधमाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत 35 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांकडे पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलेचा पती आहे. ३० एप्रिल रोजी पीडित महिलेच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून पतीने रागाने ' तू कोणाबरोबर बोलत तर नाहीत ना' म्हणून तिच्या हाताला जोरात ओढून तिला बेडरूममध्ये नेत कडी लावली. त्यानंतर महिलेची चार मुले बाहेरून ओरडत असतानाही, आरोपीने दरवाजा न उघडता महिलेस बेडवर पाडून तिला नग्न केले. पीडितेच्या कुर्ता व सलवार,ओढणीने तिला बेडला बांधले. हिटर गरम करून पत्नीच्या शरीरावर चटके दिले. त्यानंतर पत्नीचे अवयव भाजलेल्या अवस्थेत असताना क्रुरतेने शारीरिक संबंध केले. त्यानंतर तेलाची बाटली, दगडी बत्ता घेऊन तो पीडितेच्या गुप्तांगात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आत गेला नाही त्यामुळे आरोपीने तिच्या तोंडात त्याचा पाय घातला. त्यानंतर पत्नीच्या तोंडावर लघवी करून ' तुला खूप माज आला आहे, तुझा माज उतरवतो 'म्हणून शिवीगाळ केली.
तसेच, पीडितेच्या डोक्यात, हातापायावर खलबत्त्याने मारहाण केली. मुलांचा जास्त आरडाओरडा झाल्यानंतर स्वतः कपडे घालून तसेच पत्नीस कपडे घालण्यास सांगून बेडरूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी चार मुले पळत आईकडे आली असताना, तिची अवस्था पाहून ते रडू लागले. त्यावेळी 'ही मुले देखील माझे आहेत की नाहीत' असे म्हणून पत्नी सोबत मुलीबरोबरदेखील सेक्स करू आणि त्यांची काय हालत करतो, ते पहा, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे १६ व ११ वर्षांच्या दोन मुलींनीही शरमेने मान खाली घातली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. भाबड पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.