आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या प्रियकराकडून जीवे मारण्याची धमकी:दोघांना सोबत पाहिल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने विवाह बाह्य प्रेमसंबंध ठेवल्याने पतीने सदर प्रेम संबंध संपुष्टात आणण्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी ही तिचे प्रेमसंबंध चालूच राहिल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले आणि पत्नीच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश मिनीनाथ घुले (वय 24, रा. नेरे दत्तवाडी, मुळ रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांची बहीण अनिता मिनीनाथ घुले (वय 25, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याचा आश्विनी हिच्या बरोबर 7 जुलै 2021 रोजी विवाह झाला होता. तो भांड्याचे दुकानात काम करीत होता. एक दोन वर्षे गावात राहिल्यानंतर जुलै 2022 मध्ये तो आपली पत्नी आश्विनी हिला घेऊन आई वडिलांना काही एक न सांगता गावातून निघून पुण्यात राहण्यास गेला. फिर्यादी यांनी भावाला विचारल्यावर त्याने आपल्या पत्नीचे अजिंक्य घुले याच्याबरोबर प्रेमसंबंध असून तो गावात बदनामी करतो.

त्याला जाब विचारल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पुण्यास राहण्यास आलो, असे त्याने फिर्यादीला सांगितले होते. पुण्यात तो स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो पुण्यात आल्यावर अजिंक्यही पुण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता तो घरी आला. तेव्हा त्याची पत्नी व अजिंक्य हे एकाच रुममध्ये होते. त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. अजिंक्य घुले याने त्याला मारहाण करून तुझ्या बायकोबरोबर माझे संबंध राहणार. तुला काय करायचे ते कर. एक दिवस तुझा काटा काढून तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी जीवे मारण्याची धमकी त्याने गणेशला दिली. ही घटना फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी अजिंक्य घुले याला फोन करून विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

फिर्यादी या पुण्यात आल्या. गणेश याच्या पत्नीला घेऊन फिर्यादी मुंबईला गेल्या. दुसर्‍या दिवशी त्यांनी गणेश याला फोन केला असता तो उचलत नव्हता. तेव्हा त्या गणेशच्या रुमवर गेला असता गणेश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी अंत्यविधी केल्यानंतर गुरुवारी फिर्याद दिली असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...