आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:पुण्यात ऑफिसमध्ये जाऊन पतीने केला पत्नीचा खून

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीत किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा कार्यालयात जाऊन चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना गुरुवारी भरदिवसा घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कीर्ती रविकुमार पोटे (४३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रविकुमार पोटे (५०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटे दांपत्य डहाणूकर कॉलनीत २३ वर्षांच्या मुलीसोबत राहते. गुरुवारी दुपारी कीर्ती पोटे या त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. या वेळी रविकुमार याने चाकूने कीर्ती यांच्यावर वार केले. जखमी अवस्थेत कीर्ती यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या खुनामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser