आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिणीला घराबाहेर काढले:लग्नाच्या आमिषाने दिराकडून महिलेवर अत्याचार; पतीचे 2 वर्षापूर्वी झाले होते निधन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे निधन झाल्यानंतर सख्ख्या दिराने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार देत महिलेला व तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत घराबाहेर काढल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात 33 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यानुसार, 32 वर्षीय दिरावर गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पुण्यात मुलींसोबत त्या राहत असत. मात्र, यादरम्यान, सख्ख्या दिराने तक्रारदार यांना मी तुझा आणि मुलीचा सांभाळ करतो असे सांगून निलंगा येथे नेले. त्याठिकाणी जबरदस्तीने त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. परंतु, आता दीर वाद घालत होता. तर, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन त्यांना घरातून बाहेर काढले.

रिक्षा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

वाहन चोरीच्या घटना वाढत असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने रिक्षा चोरट्यास सापळा रचून अटक केली. त्याला जुना बाजार परिसरातील कोंबडी पुलावर पकडण्यात आले असून, चोरीची रिक्षा जप्त केली आहे. निलेश रमेश कंधारे (वय 32, रा. पौड रोड, कोथरूड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून अलंकार पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकरण?

खंडणी विरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोंबडी पूल जुना बाजार येथे एक व्यक्ती थांबला असून, त्याच्याकडे चोरीची रिक्षा आहे. त्यानूसार, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस अंमलदार लाजेंद्र लांडगे व पथकाने त्याला सापळा रचून पकडले. रिक्षाची चौकशी केल्यानंतर त्याने रिक्षा डहाणूकर कॉलनीतून चोरल्याची कबूली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी अलंकार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चोरीस गेलेली 50 हजार रुपयांची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...