आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवाहानंतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय जोडीदारासोबत शारीरिक संबंध न ठेवणे क्रूरता असल्याचे निरीक्षण नोंदवून पतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी मंजूर केला. पत्नीचे नात्यातील व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे समाजमाध्यमावरील संदेशातून उघड झाले असून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे कारणही घटस्फोटासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
अक्षय व कृतिका (नावे बदलली आहेत) अशी विवाहित जोडीचे नाव आहे. अक्षयच्या वतीने न्यायालयात ॲड. के. टी. आरू-पाटील, ॲड. केदार केवले व ॲड. प्रज्ञा गुरसळ यांनी बाजू मांडली. अक्षय व कृतिकाचा विवाह एप्रिल २०२० मध्ये झाला. त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली. मात्र, तिने पतीला शरीरसंबंधास नकार दिला. ती वारंवार माहेरी जात होती. दरम्यान, पत्नीचे नात्यातील व्यक्तीसोबतच संबंध असल्याचे सोशल मीडियातून पतीच्या कळाले. काही दिवसांनी पत्नी पळून गेली होती.
बाहेरील संबंध केले मान्य पतीने पोलिसात पत्नी हरवल्याची पोलिसांत तक्रार दिली. कृतिकाला ताब्यात घेतले असताना ती मर्जीने घर सोडून गेल्याचे सांगितले. ‘नात्यातील एका व्यक्तीसोबत दोन दिवस बाहेर गेली होती. मला पतीबरोबर संसार करायचा नाही,’ असा जबाब पत्नीने दिला. त्यामुळे पतीने मानसिक क्रूरतेच्या कारणाखाली घटस्फोट मिळण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. विवाहानंतर पत्नीने पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे तसेच नात्यातील व्यक्तीसोबत असलेले संबंध हे मानसिक क्रूरता असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला, असे पतीचे वकील ॲड. के. टी. आरू-पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.