आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी मिरवणूक तुम्ही पाहिली नसेल!:​​​​​​​ग्रामपंचायत निवडणूकीत पतीचा विजय, पत्नीने खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेणुका गुरव असे या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

अनेक दिवसांपासून गावखेड्यांमध्ये निवडणुकांचा गोंधळ सुरू होता. गावच्या निवडणुकीत काय होणार याची उत्कंठा सर्वांनाच होती. अशातच सोमवारी निवडणुकांचे निकाल लागले आणि गुगाल आपलाच म्हणत सर्वांनी विजयोत्सव साजरा केला. आनंद साजरा झाला, जल्लोष झाला, गुलाल उधळला गेला. मात्र यात एका पत्नीने आपल्या पतीची काढलेली मिरवणूक आता चर्चेता विषय ठरत आहे. पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली. सध्या सोशल मीडियावर ही मिरवणूक चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवला. दरम्यान या गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने थेट आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला. ही अनोखी मिरवणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या महिलेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांकडून महिलेचे कौतुक केले जात आहे.

रेणुका गुरव असे या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढणाऱ्या पत्नीचे नाव आहे. संतोष शंकर गुरव यांनी 221 मते मिळवत विरोधी उमेदवारावर 44 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी आनंदोत्सव साजरा करत पतीला थेट खांद्यावर उचलून घेत गावात फिरवले. आपण कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नेहमीच बघतो. मात्र पतीला खांद्यावर घेऊन आनंदोत्सव साजरा करणाऱ्या पत्नीची ही मिरवणूक यापूर्वी कुणीही बघितली नसेल.

बातम्या आणखी आहेत...