आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Husbond Killed Wife Pune | Pune Crime News | Arguments Often Break Out Because The Husband Consumes Alcohol; Accused Husband Arrested By Police

घरगुती वादातून पत्नीचा निर्घृण खून:पती दारू पित असल्याने वारंवार सुरू होते वाद; आरोपी पतीला पोलिसांकडून अटक

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या घरगुती वादातून पत्नीचा डोक्यात कशाने तरी मारहाण करून तिचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे (वय-34)या महिलेचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तिचा पती सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन वारंवार दारू पीत असल्याने वाद होत होते. दोन ऑगस्ट रोजी सचिन याच्या आजोबांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम होता. मात्र, सचिन त्या कार्यक्रमाला न थांबता रानातील पोल्ट्रीवर थांबला होता. त्याने पत्नी रुपाली हिला देखील तेथे बोलावून घेतले होते, रात्री उशिरा रुपाली पती सचिनकडे पोल्ट्रीवर गेली असता त्यांच्यात वाद झाले आणि त्याने तिच्यावर हल्ला केला. बुधवारी पहाटेच्या सुमारास रुपाली हिला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटल येथे आणले असता तिच्या डोक्यात तसेच गळ्यावर काही जखमा होत्या. तर रुपाली ही मयत झालेली होती.

खुनाचा गुन्हा दाखल

याबाबत रुपालीच्या नातेवाईकांनी सचिन यास विचारपूस केली असता त्याने रात्री आमच्यात वाद झाल्याने मी रुपाली हिला मारले असल्याचे सांगितले. असे नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. याबाबत रुपालीची बहिण ललित दत्तात्रय गावडे( वय -26 वर्षे रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे) हिने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी आरोपी सचिन दत्तात्रय खंडाळे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...