आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना:आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनाने निधन, पुण्यात उपचारासाठी नेले जात असतानाच रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यामधील परभणी येथील मूळचे रहिवासी आणि त्रिपुरा केडरचे अधिकारी असलेल्या सुधाकर शिंदे या ३४ वर्षीय वरीष्ठ अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन झाले. औरंगाबाद येथून पुण्यात उपचारासाठी नेले जात असतानाच त्यांचा रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती रुबी हॉल रुग्णालयाचे इमर्जन्सी विभागाचे डॉ. अवधूत बोगुंवर यांनी दिली.

सुधाकर शिंदे हे सध्या त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात सहायक सचिव पदावर कार्यरत होते. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील उमरा गावचे रहिवासी होते. ते काही दिवसांपूर्वी गावाकडे आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आधी त्यांनी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. तिथे प्रकृती न सुधारल्याने त्यांना गुरुवारी औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना शुक्रवारी कार्डियाक अॅम्ब्युलन्सद्वारे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात येत होते. परंतु रुबी हॉल रुग्णालयात रुग्णवाहिका शुक्रवारी सांयकाळी चार वाजून ५० मिनिटांनी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सुधाकर शिंदे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.