आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतून बंडखाेरी करुन बाहेर पडलेले गटनेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाेबत किती आमदारांचे संख्याबळ आहे सिध्द केलेले नाही, त्यामुळे शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख म्हणून गटनेता काेणाला नेमावयाचे याबाबत आदेश काढू शकतात. त्यांनी व्हीप काढला तर ताे इतर अामदारांना लागू असताे. मात्र, एकूण आमदारांच्या 2/3 आमदारांचे बहुमत असेल आणि त्यांनी वेगळा गट काढला तर संबंधित व्हीपचा काेणताही परिणाम हाेऊ शकत नाही असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी बुधवारी व्यक्त केले आहे.
बापट म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू झाली तर मूलभूत अधिकारावर काेणता परिणाम हाेत नाही. सहा महिन्यात निवडणुक आयाेग निवडणुक घेऊ शकते. राज्यपाल प्रथम विराेधी पक्षाला सत्ता स्थापनाबाबत आमंत्रण देतील. त्यांनी सत्ता स्थापनास नकार दिला तर राष्ट्रपती राजवट लागू करणे अटळ आहे. मुख्यमंत्री यांनी बहुमत गमवल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागताे. जर मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्यासह सरकार बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपाल यांना आहे. ज्यावेळी घटनेत एखाद्या गाेष्टीचा उल्लेख नसेल तर त्याबाबत जुने कायदे, नियम यांना धरुन नैतिक अधिकार संबंधितांना प्राप्त हाेताे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.