आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास फडणवीस हेच मुख्यमंत्री, मराठा महिला मुख्यमंत्र्याबाबतचे वक्तव्य कार्यक्रमापुरतेच; आशिष शेलारांचे स्पष्टीकरण

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची, आदित्य यांना बारची चिंता, शेलार यांची टीका

भाजपची राज्यात पुन्हा सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आपल्या वक्त्याव्याबाबत सारवासारव केली आहे. मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शेलार यांनी कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली होती.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी शेलार आले होते त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे आदी उपस्थित होते. शेलार म्हणाले, कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवरील पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात मी त्यावर बोललो. समाजातील सर्व स्त्रिायांना उचित आणि सर्वोच्च स्थान मिळायला हवे या मताचा मी आहे. पुस्तकापुरताच तो विषय होता. राज्यात भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसच असतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे पळपुटे आणि पराधीन असल्याची टीका शेलार यांनी केली. तसेच जनतेच्या प्रश्नावर महाआघाडीच्या ठाकरे सरकारकडून पळ काढण्यात येते किंवा पराधीन आहोत, अस उत्तर देण्यात येते. प्रत्येक प्रश्नावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवते. इतर राज्यात शेतकऱ्यांसह बलुतेदारांना आपल्या परीने मदत केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून कुठलीही मदत करण्यात आली नाही. अकार्यक्षम सरकार असल्याचा ठपका शेलार यांनी ठेवला.

मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची, आदित्य यांना बारची चिंता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईबाहेर बॉलीवूड जाऊ देणार नाही म्हणतात. त्यांना बॉलीवूडची चिंता आणि पुत्र अदित्य ठाकरे हे पब आणि बारची चिंता करतात. ठाकरे सरकार हे अकार्यक्षम सरकार आहे. पब, बार आणि हॉटेल नियम घालून उडली जाऊ शकतात, तर त्याच वेळी योग्य नियम घालून मंदिर का उघडली नाही, असा सवालही त्यांनी केला. कुठलीही मागणी नसताना पब, रेस्टॉरंटची वेळ वाढवण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

सुप्रियांना मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा पाठिंबा नाही : पाटील

राज्यात मुख्यमंत्रिपदी कर्तृत्ववान मराठा महिला असावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात माेठा वर्ग आहे. यासाठी माझे समर्थन आहे, असे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले हाेते. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे यांना मुख्यपंत्रिपदासाठी भाजपचा पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे की नाही याचा निर्णय राष्ट्रवादी घेईल. शेलारांचे वक्तव्य वैयक्तिक होते.

बातम्या आणखी आहेत...