आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • If The Horns On The Mosques Are Not Removed In Four Days, We Will Start Shouting, MNS Cell Chief Warns, Pune MNS Splits Due To Noise | Marathi News

मनसेचा इशारा:मशिदींवरील भोंगे चार दिवसांत न काढल्यास खळ्ळ खट्याक करू, मनसे सेल प्रमुखाचा इशारा, भोंग्यांच्या वादावरून पुणे मनसेत दुफळी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे सुरू राहिल्यास त्यासमाेरच जाेरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरून पुण्यात मनसेमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुणे शहर मनसेच्या एका सेल प्रमुखांनी डेक्कन पाेलिस ठाण्यात लेखी पत्र देऊन, डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे चार दिवसात न काढल्यास खळ्ळखट्याक करण्याचा इशारा दिला आहे.

मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस व पुणे शहर अध्यक्ष (रस्ते-साधन, सुविधा, आस्थापन विभाग)अश्विन चाेरगे यांनी पाेलिसांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे की, आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची इच्छा नाही अथवा प्रार्थनेला विरोध नाही. परंतु अनधिकृत भोंग्यांमुळे सर्वसामान्य नागरिक,वृद्ध व विद्यार्थी यांना होणारा त्रास मनसे खपवून घेणार नाही. अनधिकृत भोंगे बंद करण्याची जबाबदारी पाेलिस व सरकारवर आहे.

आम्ही मशिदींसमोर भोंगे लावणार नाही : वसंत मोरे
पुणे मनसे शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत माेरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेला विरोध करत आम्ही मुस्लीमबहुल भागाचे प्रतिनिधीत्व आम्ही करत असल्याने प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमाेर भोंगे लावणार नाही. मी पक्षाच्या भूमिकेवर नाराज नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...