आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इशारा:आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लावल्यास ठिय्या, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माेर्चात प्राण गेलेल्या 42 मराठा बांधवांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी देण्याची मागणी

मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाने २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोर्चा काढला होता या माेर्चात प्राण गेलेल्या ४२ मराठा बांधवांच्या कुटुंबांना १० लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी राज्य सरकारने द्यावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर नऊ ऑगस्टला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक नानासाहेब जावळे पाटील म्हणालेे, ठाकरे सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असून केवळ चर्चा करण्यात वेळ घालवत आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते काही करत नाही. केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत आहे. ९ ऑगस्टपर्यंत कुठलीही चर्चा न करता सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा व १५ हजार लोकांवरील गुन्हे ततत्काळ मागे घ्यावे, अन्यथा महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

दोन वर्षांत केवळ आश्वासने

मराठा आरक्षणाकरीता बलिदान केलेल्या औरंगाबाद येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आसाराम एरंडे म्हणाले, माझ्या मुलाने २०१८ मध्ये आरक्षण मागणीसाठी आंदोलन केले आणि त्याने जीवन संपवले. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि दहा लाख रुपये मदत देतो, असे जाहीर केले. परंतु अद्याप यापैकी काहीही मिळाले नाही. न्याय मिळालेला नाही.