आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:नियम पाळले नाहीत तर एप्रिलमध्ये लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल, अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांनी सध्याच लॉकडाउन न लावण्याचा निर्णय घेतला

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनासाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. दरम्यान पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात जिल्हाधिकारी, महापौर, महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी पुणेकरांना इशारा दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास एप्रिलमध्ये लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल असे अजित पवार म्हणाले.

पुणे शहरामध्ये 1 ते 14 एप्रिल या कालावधीत लॉकडाउन करण्यात यावे असा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाउन करण्यास विरोध दर्शवला. लॉकडाउन केलेल्या शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही असा आजवरचा अनुभव असल्याचे ते म्हणाले. यामुळे लॉकडाउन करु नये असे ते म्हणाले. या बैठकीनंतर अजित पवारांनी सध्याच लॉकडाउन न लावण्याचा निर्णय घेतला. तसेच नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घालून दिलेले नियम लोकांना पाळले पाहिजे. ते जर पाळले नाहीत, तर येत्या 2 एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल' असा इशाराच त्यांनी पुणेकरांना दिला आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात यावी. ग्रामीण भागांमधील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जावी. गरज पडली तर मनुष्यबळ वाढवण्यात यावे. खासगी रुग्णालयांमध्ये 50 टक्के बेड्स राखीव करावे. जिल्ह्यामधील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा' या सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...