आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:गणेशोत्सवात गर्दी झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लावू : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे सांगण्यात आले असून नव्याने काेणतेही निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ देऊ नका. पुण्यातील गणेशोत्सवात राज्य तसेच परदेशातील नागरिक येतात. मात्र, काेराेना संकटामुळे यंदा देखाव्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी फार गर्दी झाल्याचे जाणवले तर दुसऱ्याच दिवशी आढावा घेऊन कडक निर्णय घेण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला.

पुण्यातील विधानभवन येथे काेराेना आढावा बैठकीनंतर ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, दिल्लीत मागील दहा महिन्यांपासून शेतकरी आंदाेलन करत आहेत. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, पेट्राेल-डिझेल शंभरीपार गेले असून गॅसचे भाव एक हजार रुपयांपर्यंत वाढलेले आहेत, असेही ते म्हणाले.

देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईला ताेंड देत असतानाच दुसऱ्या बाजूला काेराेनामुळे जनता त्रासलेली आहे. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. व्यवसायाचे नुकसान झाले आहे. अशावेळी केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने व इंधनाचे वाढते दर आटाेक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे हाेते. मात्र, यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता तरी सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे, असेही पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारने निर्देश दिल्यानेच मंदिर बंद
मंदिरे उघडण्याबाबत अनेकांची मागणी असू शकते. जिथे श्रद्धा त्याठिकाणी लाेकांची ये-जा करता आली पाहिजे त्यास आमचाही विराेध नाही. मात्र, एखाद्या जागी भाविक वाढले तर काेराेनाचा धाेका वाढू शकताे, असे पत्र केंद्र सरकारच्या आराेग्य विभागाने राज्यांना दिलेले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी हे तपासून पाहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...