आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:कामात सुधारणा झाली नाही तर माेठी कारवाई, पुण्यात काेराेना आटाेक्यात नसल्याने उपमुख्यमंत्र्यांनी दिला अधिकाऱ्यांना दम

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरेसे बेड उपलब्ध असतानाही प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने नाराजी

मुंबईतील काेराेनाची वाढती रुग्णसंख्या आटाेक्यात आली असली तरी अद्याप पुण्यातील रुग्णसंख्या कमी हाेण्याएेवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल ५ हजार रुग्ण पुणे जिल्ह्यात वाढल्याने पुढील परिस्थिती गंभीर हाेऊ शकते. पुण्यातील काेराेनाची परिस्थिती आटाेक्यात येत नसल्याने उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतलेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत पुरेसे बेड उपलब्ध असतानाही प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने नाराजी व्यक्त केली.

काेराेनाची परिस्थिती लवकर नियंत्रणात आणा. ‘कामात सुधारणा झाली नाही तर मला माेठी कारवाई करावी लागेल’ असा दमही पवार यांनी या वेळी अधिकाऱ्यांना भरला. या बैठकीस महापाैर मुरलीधर माेहाेळ, विभागीय आयुक्त साैरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित हाेते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जम्बाे हाॅस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी येथील परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. बेडच्या उपलब्धतेची माहिती पाेहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दाेषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला.

आॅक्सिजनचा तुटवडा नको
पुणे जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढल्याने दैनंदिन आॅक्सिजनच्या उपचारासाठी रुग्णालयात गरज वाढली आहे. पुण्यासह काेल्हापूर, सातारा, सांगली, साेलापूर या जिल्ह्यांतही आॅक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियाेजनबद्ध कार्यवाही करावी. विभागातील काेणत्याही रुग्णाला आॅक्सिजनअभावी जीव गमवावा लागू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे.

बातम्या आणखी आहेत...