आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे पुणे- मुंबई आणि इतर उपनगरात दररोज चाकरमानी रेल्वेने ये- जा करतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील प्रवाशांना दररोज रेल्वेच्या वेळेला पोहोचता येत नाही. त्यामुळे रेल्वेत असलेला आधीचा प्रवासी आपल्या मित्रासाठी चेन ओढतो. यामुळे रेल्वेला याचा मोठा फटका बसतो. गेल्या वर्षभरात तब्बल ११६४ चेन ओढीच्या घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना नियोजित रेल्वे गाठण्यासाठी एक तास आधी स्थानकात येण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत अनेक नागरिक हे अडकून पडत आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातही मोठी वाहतूक कोंडी असते. यामुळे प्रवाशांना स्थानकावर येण्यास उशीर होतो. यामुळे प्रवाशांचे नातेवाईक रेल्वेच्या डब्यात असणारी चैन ओढतात. यामुळे रेल्वे स्थानकावरच थांबवली जाते. परिणामी स्थानकावरून निघण्यास रेल्वेला उशीर होतो. याचा फटका मात्र, रेल्वेला बसत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान रेल्वेचे होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर येण्यास होणारा वेळ लक्षात घेता प्रवाशांनी त्यांच्या रेल्वेगाडीच्या वेळेच्या एक तासाआधीच स्थानकावर यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून या वेळी करण्यात आले आहे. चेन ओढल्याने प्रवाशांना १ लाख ८० हजारांचा दंड या संदर्भात बोलताना पुणे रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, पुण्यात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर येताना स्थानकावर एक तास आधी पोहचावे. या साठी त्यांनी त्यांचे घर आणि स्थानक यांच्यातील अंतर याचा अंदाज घेऊन घरा बाहेर पडावे. आणि गाडी सुटण्याच्या एक एक तास आधी स्थानकावर पोहचावे. चैन ओढल्याने आतापर्यंत अनेक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या वर्षी चेन ओढण्याच्या तब्बल ११६४ घटना या उघडकीस आल्या आहेत. त्यातील ९१४ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.