आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाज सेंटरमध्ये अवैध धंदे:पुण्यात स्पा सेंटरवर छापा; एका विदेशी महिलेसह 3 महिलांची सुटका

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे ग्रामीण पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने स्पामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायाचा पर्दाफाश करत थायलंडमधील एका महिलेसह तीन महिलांची सुटका केली. सिंहगड रस्त्यावरील टोनी सोसायटीच्या व्यापारी संकुलात हे स्पा सेंटर आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पोलिस निरीक्षक विजय चव्हाण आणि एएचयूचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्पावर छापा टाकला.

संबंधित स्पा कम मसाज सेंटरमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. याची शहानिशा पंटरमार्फत करून छापा मारण्यात आला. यात थायलंडमधील एका तरुणीसह इतर तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.

बातम्या आणखी आहेत...