आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभावाच्या औषधोपचारासाठी घेतलेल्या 30 हजारांवर तब्बल 1 लाख 29 हजारांचे व्याज मागत कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला युनीट एकने जेरबंद केले. न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश बन्सिलाल भाटी (वय 54 रा. भवानी पेठ,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गुरुवारी दिली आहे.
फिर्यादी तरुणाने भावाच्या औषधोपचारासाठी सतिश भाटी यांच्याकडून दरमहा 15 टक्के व्याज दराने 30 हजारांची रक्कम घेतली. त्याबदल्यात दुचाकीची कागदपत्रे आणि दोन धनादेश भाटीला दिले. आरोपीने साथीदारासह तरुणाच्या घरात शिरुन 22 महिन्यांचे व्याज आणि मूळ असे 1 लाख 29 हजारांची मागणी केली. रक्कम न दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.
आरोपी ताब्यात
भाटीने तरुणाचा धनादेश बँकेत वठवून 19 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर युनीट एकने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या दुकानासह घरामध्ये 64 धनादेश, बँकेचे 16 पासबुक, मोबाइल असा 10 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदिप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, राहुल मखरे, अनिकेत बाबर , शशिकांत दरेकर दत्ता सोनवणे, अभिनव लडकत, रुखक्साना नदाफ यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.