आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अवैध दारुचा भांडाफोड:तळघरात बनवली जायची देशी दारू, दिशाभूल करण्यासाठी घराबाहेर बांधले होते मंदिर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तळघरात दारु बनवली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली

पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या टीमने एक घरावर छापा मारुन अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारुच्या फॅक्टरीचा भांडाफोड केला. विशेष म्हणजे ही दारुची फॅक्टरी घराखाली असलेल्या तळघरात सुरू होती आणि त्यात जाण्यासाठी एक लहान रस्ताही तयार करण्यात आला होता. रेड मारुन पोलिसांनी 2200 लीटर देशी दारू जप्त केली.

बुधवारी सकाळी पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यांचा शोध सुरू आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे सीनियर पोलिस इंस्पेक्टर विट्ठल कुबडे यांनी सांगितेल की, या अवैध दारू धंद्यातील मुख्य आरोपीचे नाव ज्योती अविनाश मारवाडी(30)असून, तिच्याच घरात ही फॅक्टरी सुरू होती.

दिशाभूल करण्यासाठी बांधले मंदिर

कुबडे यांनी पुढे सांगितले की, तपासात समोर आले की, आरोपी मारवाडीने दातवाडीमधील आपल्या घरात दारुचा मोठा साठा जमा केला होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री त्या घरावर छापेमारी करण्यात आली. दरम्यान, लोकांची दिशाभूल करण्यासाठी या घराबाहेर एक मंदिर बांधण्यात आले होते. रोज शेकडोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत होते.

बातम्या आणखी आहेत...