आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:बेकायदेशीर सावकार जेरबंद; 30 हजारांचे मागत होत 1 लाख व्याज

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावाच्या औषधोपचारासाठी घेतलेल्या ३० हजारांवर तब्बल १ लाख २९ हजारांचे व्याज मागत कुटुंबातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराला पुण्याच्या युनिट एकने गुरुवारी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश बन्सीलाल भाटी (५४, रा. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

फिर्यादी तरुणाने भावाच्या औषधोपचारासाठी सतीश भाटी यांच्याकडून दरमहा १५ टक्के व्याजदराने ३० हजारांची रक्कम घेतली. त्या बदल्यात दुचाकीची कागदपत्रे आणि दोन धनादेश भाटीला दिले. आरोपीने साथीदारासह तरुणाच्या घरात शिरून २२ महिन्यांचे व्याज आणि मूळ असे १ लाख २९ हजारांची मागणी केली. रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...