आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बेकायदा सावकारी करणारे दांपत्य अटकेत; घर बळकावण्याचा प्रयत्न

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदा सावकारी करणाऱ्या दांपत्यास खंडणीविराेधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम निवृत्ती पोकळे (४३) आणि त्याची पत्नी हेमा ऊर्फ रेखा (३६, दोघे रा. धायरी, पुणे) यांना अटक केली आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलिसांत फिर्याद दिली. तक्रारदार महिला धायरी भागात राहायला आहे. आरोपी पोकळे तिच्या ओळखीचे आहेत. महिलेने व्यवसायासाठी आरोपींकडून १५ टक्के व्याजाने सहा लाख ४५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर मे २०२२ पर्यंत महिलेने व्याजापोटी पोकळे यांना नऊ लाख ४५ हजार रुपये दिले.

बातम्या आणखी आहेत...