आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय:वेताळ टेकडी वरती करण्यात येत असणाऱ्या 250 पोल्सचे बांधकाम तात्काळ थांबवा; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या सूचना

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालभारती ते पौड फाटा लिंक रोडबाबत महानगरपालिकाकडे प्राप्त हरकतींबाबत सविस्तर सुनावणी होईपर्यंत सदर टेकडीवरती कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये, तसेच वृक्षतोडही न करण्याबाबत सूचना संबंधितांना तात्काळ देण्यात याव्यात अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरविकास विभाग प्रधान सचिव आणि पुणे मनपा आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

बालभारती ते पौड फाटा लिंक रोडबाबत रेखांकन करण्याचे काम सध्या सुरू असून त्यानुषंगाने वेताळ टेकडीवरती 250 काँक्रीट पोल्स उभे करून रस्त्याचे रेखांकन करण्यात येणार आहे. याबाबत 25 एप्रिल रोजी पत्राद्वारे न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे वृक्षतोड करू नये तसेच रहदारी कमी करण्यासाठी सदर रस्त्याचा उपयोग किती होणार आहे याचेही सर्वेक्षण करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले होते. तसेच पुणे शहरातील पर्यावरण संरक्षणामध्ये काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून त्यांचे हरकतीचा सकारात्मक विचार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार हरकतींवर सुनावणी होईपर्यंत कोणतेही काम न करण्याचा आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

विकासाबाबत पुढील निर्णय घ्यावा

आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी बैठकांचे आयोजन सर्व पातळीवर होत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास शिखर समितीची बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या पार्श्वूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाला, नवीन आराखडा तयार करताना पंढरपूर स्थानिक रहिवाशी यांना विचारून निर्णय घेण्यात यावा.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरचा आराखडा मंजुरीच्या मधील सर्व अडथळे दूर करावेत व आराखडा तात्काळ मंजूर करावा. हा आराखडा अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे. महिलांसाठी फिरते रुग्णालय उपलब्ध करून द्यावे. मैला व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अत्यंत नेटके करावे अशा सूचना करण्यात आले आहे.